माझ्याबद्दल
माझ्या विषयी लिहावं एवढं मोठा मी नाहीय, मी कुणी मोठा कवी किंवा लेखक नाही, छोट्या छोट्या चार ओळी आणि मनात आलेले काहीतरी चार शब्द कागदावर लिहिण्याचा माझा छंद. आपल्या मायबोली मराठी आणि अहिराणी भाषेतील माझ्या काही चारोळ्या, कविता, थोडंफार केलेलं लिखाण या ब्लॉगच्या च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी केलेला एक प्रामाणिक छोटेखानी प्रयत्न.
अश्याच लिखाणातून तुमच्या सारख्या सगळ्या मित्रांकडून मिळालेल्या प्रतिसादातून माझी उमेद वाढत गेली आणि मी लिहीत गेलो. भाषाशुद्धी हा प्रयत्न लिखाणात असतो. खरं तर न आणि ण यातला फरक ही मला कळलेला नव्हता, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी लिहीत असतांना कुठंतरी वाचत असतांना लक्षात येत गेले. माझ्या मनात जे येईल ते मी लिहून मोकळं होत असतो, आणि बऱ्याच वेळा लिहिलेलं पुन्हा वाचण्याच धाडस होत नाही, कारण हेच की हे मीच लिहिलं आहे का? आपण असे कधी होतो? हे सगळं खरंच माझ्या आयुष्यात झालं आहे का? असले एक ना अनेक प्रश्न मनातून डोकावतात. बऱ्याच वेळा मी साधं मॅसेज चॅटमध्ये खूप बोलून जातो किंवा संतापात भांडणात. मनातील भावना नकळत बाहेर येतात, मग समुरून आलेला रिप्ले "छान होती कविता" अरे.. अस कसं असू शकतं. मी जनरल बोलत होतो. याचा एक चांगलाच फायदा मला आहेच पण कधी कधी वाटतं आपल्या भावनांना किंमत नाही आपण कितीही काहीही लिहिलं साधं जरी बोललो तरी त्याला कविताच म्हणतात. मग माझ्या भावना मी आताच ठेवल्या आणि त्या कविता आणि चारोळीच्या माध्यमातून उपसत गेलो. या असा काहीसा हा प्रकार आहे.
खूप काही लिहिण्या बोलण्या सारखं नसलं तरी तरी भरपूर प्रमाणात इथं मांडून मोकळं होत असतो मी, हा मग तुम्ही सायलेंट म्हणा, इमोशनल म्हणा हवं तर रडका म्हणा की अजून दुसर काही. मनातील सगळं असह्य झालं की ते लिहून मोकळं व्हावं एवढ येत. आणि अधून मधून हेच करत असतो मी. आणि पुढे ही करेलच.. तुम्हा सगळ्या मित्रा परिवाराच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन नेहमी असच राहुद्यात यातूनच सुचलेले जमलं तस लिहितच राहील.
कविता, चारोळ्या, ब्लॉग, स्केचिंग, पेंटींग..
No comments:
Post a Comment
ह्या ब्लॉगवर काही आवडले असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा .