Wednesday, July 31, 2019

आठवणी

आठवणी






आठवणी येत नाही, त्या हळूवार उतरतात आत शांत पडलेल्या हृदयाच्या काठावर.
साठवत जावं त्यांना मन आणि अंतरंगात.
रमू द्यावं, मनसोक्त हिंडु द्यावं त्यांना..
सूर्यास्तानंतर शांत बघत बसावं समोरच्या शांत आसमंताकडे..
हळुवार येणाऱ्या वाऱ्यासोबत एकटंच बोलत बसावं..

एकांताची व्याख्या माहीत आहे का?
तिथं भेटी होतात दुरावलेल्या नात्यांच्या,
बांध फुटतो विस्कटलेल्या मनातील भावनांना..!


No comments:

Post a Comment

ह्या ब्लॉगवर काही आवडले असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा .